news

‘मएसो’चा सामाजिक भोंडला

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांमध्ये यावर्षी ‘सामाजिक भोंडला’ हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला. मुलगा-मुलगी कोणताही भेदभाव न करता सर्वांनी एकत्रितपणे या भोंडल्यात सहभागी व्हावे आणि शाळेशी संबंधित सर्व घटकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचे महत्व समजावे म्हणून भोंडल्यासाठी पर्यावरणपूरक …

‘मएसो’चा सामाजिक भोंडला Read More »

म.ए.सो. नियामक मंडळाच्या उपाध्यक्षपदी आनंदी पाटील व बाबासाहेब शिंदे यांची नियुक्ती

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षपदी सौ. आनंदी पाटील आणि बाबासाहेब शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सौ. आनंदी पाटील या मेकॅनिकल इंजिनिअर असून व्यवसायाने उद्योजिका आहेत. मार्च २०१७ पासून त्या मएसोच्या नियामक मंडळाच्या सदस्य आहेत. मएसो बाल शिक्षण मंदिर व शिशु मंदिर, भांडारकर रस्ता या शाळेच्या शाला समिती अध्यक्ष, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या …

म.ए.सो. नियामक मंडळाच्या उपाध्यक्षपदी आनंदी पाटील व बाबासाहेब शिंदे यांची नियुक्ती Read More »

स्त्रीची विविध रूपे उलगडत झाले ‘नृत्यार्पण’

मएसो बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रोड शाळेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थिनी व प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना मा. मनीषा साठे यांनी प्रस्तुत केलेल्या ‘नृत्यार्पण’ या कलाविष्काराची एक छलक …

‘बालशिक्षण’मध्ये ४० वर्षानंतर पुन्हा भरली शाळा

सकाळी घंटानाद… प्रार्थना… वर्गखोल्या, आवारात केलेला दंगा… वार्षिक स्नेहसंमेलनात सादर केलेले विविध गुणदर्शन… मित्रांशी गप्पा मारत खाल्लेला डबा… आवडत्या बाईंकडून गिरवलेले धडे… ३५-४० वर्षानंतर सगळे काही अनुभवताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. निमित्त होते, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या डेक्कन जिमखाना येथील बालशिक्षण मंदिर शाळेच्या १९८१-९० या दशकातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे! शाळेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे …

‘बालशिक्षण’मध्ये ४० वर्षानंतर पुन्हा भरली शाळा Read More »

‘मएसो’च्या विद्यार्थ्यांचा मा. पंतप्रधानांसमवेत ‘मेट्रो’प्रवास

देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी आज (रविवार, दि. ६ मार्च २०२२) पुण्यातील पहिल्या मेट्रो रेल्वे मार्गिकेचे उद्घाटन केले. गरवारे कॉलेज ते आनंदनगर या स्थानकांदरम्यान स्वतः मा. पंतप्रधानांनी मेट्रो रेल्वेतून प्रवास केला. या वेळी त्यांच्यासमवेत प्रवास करण्याची संधी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई  गरवारे प्रशालेतील विद्यार्थ्यांना मिळाली. अंजली हळदे, सायली देवरूखकर, रसिका शिखरे, रिद्धी …

‘मएसो’च्या विद्यार्थ्यांचा मा. पंतप्रधानांसमवेत ‘मेट्रो’प्रवास Read More »

‘प्रेरणादायी प्रसंगांनी संस्थेचे शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष साजरे’

म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला मिळाली स्वायत्तता महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि समाज यांच्यातील ऋणानुबंध अधिक बळकट करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन, जागतिक आव्हान ठरलेल्या कोरोना महामारीच्या परिस्थितीत केलेली सेवाभावी उपक्रमांचे आयोजन, संस्थेची १६० वर्षांची दैदिप्यमान वाटचाल मांडणाऱ्या ‘ध्यास पंथे चालता…’ या इतिहास ग्रंथाचे मा. उपराष्ट्रपतींच्या हस्ते झालेले प्रकाशन आणि या ग्रंथाची पहिली प्रत मा. राष्ट्रपतींना …

‘प्रेरणादायी प्रसंगांनी संस्थेचे शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष साजरे’ Read More »

मा. राष्ट्रपतींना ‘ध्यास पंथे चालता … ‘ ग्रंथ सादर भेट

भारताचे मा. राष्ट्रपती श्री. रामनाथजी कोविंद यांना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा इतिहास ग्रंथ ‘ध्यास पंथे चालता … ‘ आज (गुरूवार, दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी) राष्ट्रपती भवनामध्ये सादर भेट देण्यात आला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीवजी सहस्रबुद्धे यांनी मा. राष्ट्रपतींचा याप्रसंगी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मा. राष्ट्रपतींनी त्यांच्या पुणे भेटीत प्रकाशनानंतर …

मा. राष्ट्रपतींना ‘ध्यास पंथे चालता … ‘ ग्रंथ सादर भेट Read More »

 ‘मएसो’चा इतिहास ग्रंथ ‘ध्यास पंथे चालता …’ मा. उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते प्रकाशित

“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची १६० वर्षांची ऐतिहासिक वाटचाल मांडणाऱ्या ‘ध्यास पंथे चालता …’ या इतिहास ग्रंथाचे प्रकाशन करताना मला अतिशय आनंद होत आहे. हा ग्रंथ सिद्ध केल्याबद्दल मी संस्थेचे अभिनंदन करतो. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेपासूनची वाटचाल जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ संदर्भ म्हणून वाचकांना अतिशय उपयोगी ठरणार आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यासारख्या महान व्यक्तीने अन्य …

 ‘मएसो’चा इतिहास ग्रंथ ‘ध्यास पंथे चालता …’ मा. उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते प्रकाशित Read More »

‘निरपेक्ष देशसेवा हीच अनामवीरांना खरी श्रद्धांजली’

पुणे, दि. ३१ : “देशाने मला काय दिले? असा विचार न करता मी देशासाठी काय करू शकतो? हा भाव मनात बाळगून निरपेक्षपणे देशसेवा करणे हीच देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱ्या अनामवीरांना खरी श्रद्धांजली ठरेल. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वयंप्रेरणेतून काम करणाऱ्या या स्वातंत्र्य योद्ध्यांची कोणतीच वैयक्तिक आकांक्षा नव्हती, आपल्या नावाची कोणी दखल घ्यावी असा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवला …

‘निरपेक्ष देशसेवा हीच अनामवीरांना खरी श्रद्धांजली’ Read More »

माजी विद्यार्थिनी व ज्येष्ठ रंगकर्मी किर्ती शिलेदार यांचे निधन

ज्येष्ठ रंगकर्मी, प्रसिद्ध गायिका किर्ती शिलेदार यांचे आज (शनिवार, दि. २२ जानेवारी २०२२) सकाळी पुण्यात निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर, डेक्कन जिमखाना तसेच सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या त्या माजी विद्यार्थिनी होत्या. आपले आई-वडिल जयराम व जयमाला शिलेदार यांच्याकडून त्यांना संगीत आणि नाट्य कलेचा वारसा …

माजी विद्यार्थिनी व ज्येष्ठ रंगकर्मी किर्ती शिलेदार यांचे निधन Read More »