news

सव्वाशे वर्षांचा ज्ञानवृक्ष : मएसो भावे प्राथमिक शाळा

मएसो भावे प्राथमिक शाळेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दै. सकाळच्या पुणे टुडे पुरवणीत पान क्र. ४ वर आज (सोमवार, दि. २७ डिसेंबर २०२१) प्रकाशित झालेला लेख…

मा. राष्ट्रपतींबरोबर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट 

भारताचे राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद यांची त्यांच्या पुणे भेटीदरम्यान सोमवार, दि. ६ डिसेंबर २०२१ रोजी संध्याकाळी राजभवन येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव रा. सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष सीए अभय प्र. क्षीरसागर, सचिव प्रा. डॉ. भरत सि. व्हनकटे …

मा. राष्ट्रपतींबरोबर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट  Read More »

मएसो विद्यालय, बारामती शाळेचे माजी विद्यार्थी दत्तात्रेय राजाराम उंडे यांचे निधन

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बारामती येथील कै. गजाननराव भीवराव देशपांडे विद्यालय (पूर्वीचे मएसो विद्यालय, बारामती) या शाळेचे माजी विद्यार्थी आणि विद्या प्रतिष्ठान, बारामती या संस्थेचे माजी सचिव दत्तात्रेय राजाराम उंडे यांचे बुधवार, दि. ८ डिसेंबर २०२१ रोजी रात्री १० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांचे वडील राजाराम अनंत उंडे हे मएसो विद्यालय, बारामती …

मएसो विद्यालय, बारामती शाळेचे माजी विद्यार्थी दत्तात्रेय राजाराम उंडे यांचे निधन Read More »

माझ्या शालामातेला कोटी कोटी शुभेच्छा – पद्मश्री अरुण फिरोदिया

म.ए.सो. बालशिक्षण मंदिर, भांडारकर रस्ता या शाळेच्या शताद्बी वर्षातील पदार्पणानिमित्त शाळेचे माजी विद्यार्थी व ज्येष्ठ उद्योगपती पद्मश्री अरुण फिरोदिया यांनी लिहिलेला लेख शुक्रवार, दि. २२ ऑक्टोबर २०२१ रोजी दै. सकाळच्या पुणे टुडे पुरवणीच्या पान क्र. ८ वर प्रकाशित झाला.

मातृभाषेतील शिक्षणानेच लागते अभिजात साहित्याची आवड

पुणे, दि. २२ : “इंग्रजी भाषा अवगत असणे आवश्यकच आहे परंतु, मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मनात कोणताही न्यूनगंड बाळगू नये. मातृभाषेतील शिक्षणामुळे विविध विषयांतील संकल्पना स्पष्ट होतात, अभिजात साहित्याची आवड निर्माण होते, त्यामुळे इ. ७ वी पर्यंतचे शिक्षण मातृभाषेतूनच द्यावे,” अशी अपेक्षा जेष्ठ उद्योगपती व शाळेचे माजी विद्यार्थी पद्मश्री अरुण फिरोदिया यांनी आज येथे …

मातृभाषेतील शिक्षणानेच लागते अभिजात साहित्याची आवड Read More »

सामाजिक ऋण व शिधा सुपूर्ती संकल्प : पुष्प २

दिनांक : ७ जून २०२१, सोमवार समय: सकाळी ११:०० वा. वैशाख कृ. १२, शके १९४३ स्थळ: मएसो भावे प्राथमिक शाळा सभागृह, सदाशिव पेठ, पुणे -४११०३० आज दि. ७ जून २०२१ या दिवशी मएसो भावे प्राथमिक शाळेच्या  सभागृहाला एकप्रकारे मुक्त वायुविजनाचा योग आला असावा. गेले अनेक महिने केवळ शासनाच्या विद्यार्थी मासिक पोषक आहार योजनेच्या अंतर्गत वितरीत …

सामाजिक ऋण व शिधा सुपूर्ती संकल्प : पुष्प २ Read More »

म.ए.सो. सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी भाग्यश्री किशोर देसाई यांचे मनःपूर्वक अभिनंदन..!!!

म.ए.सो. सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी भाग्यश्री किशोर देसाई यांचे मनःपूर्वक अभिनंदन..!! Bhagyashree Kishor Desai was felicitated by Indian Medical Association, IMA, on Women’s Day for her achievements in theatre, films, tv, poetry and painting.

आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना श्रद्धांजली

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीदिनी आज संस्थेच्या मुख्यालयात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. बाबासाहेब शिंदे व अॅड. सागर नेवसे, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य मा. विनय चाटी, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे, …

आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना श्रद्धांजली Read More »

‘अपरिपक्व राजकीय नेतृत्वामुळे चीनविरुद्धच्या युद्धात पराभव’

“कागदावर आखलेली सीमारेषा, शस्त्र-सामुग्रीचा प्रचंड अभाव, चुकीची युद्धनीती, हवाई दलाचा वापर न करण्याचा निर्णय, चीनवर ठेवलेला अनाठायी विश्वास आणि अपरिपक्व राजकीय नेतृत्व यामुळे भारताला 1962 साली चीनविरुद्धच्या युद्धात पराभव स्वीकारावा लागला. सैन्यदलातील अधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे, युद्धातील पराभवाला जबाबदार असलेल्या राजकीय नेत्यांचे पुनर्वसन आणि नोकरशाहीला मिळालेले अभय यामुळे देशातील जनमानसाचे खच्चीकरण झाले. राजकीय नेतृत्वाला संरक्षण दलांचे …

‘अपरिपक्व राजकीय नेतृत्वामुळे चीनविरुद्धच्या युद्धात पराभव’ Read More »