नेदरलँडसच्या मॅस्ट्रीच स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या प्रतिनिधींची ‘मएसो’च्या मुख्यालयाला भेट

मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सबरोबर शैक्षणिक आणि संशोधनविषयक सहकार्य करण्याबाबत शक्यता जाणून घेण्यासाठी नेदरलँडस् येथील मॅस्ट्रीच स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील अर्थशास्त्र या विषयाचे प्रोफेसर अॅड व्हॅन मॉरिक आणि शिक्षण आणि व्यवस्थापकीय विकास विभागाचे संचालक डेव्हीड कॅस यांनी आज महाविद्यालयाला भेट दिली. तसेच त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्यालयात जाऊन संस्थेच्या नियामक मंडळाचे मा.अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे आणि संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांची भेट घेतली. मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या प्रमुख श्रीमती सुश्मिता नंदे यावेळी उपस्थित होत्या.