About MES
The city of Pune, today is known as the nucleus of education. The city owes this reputation to several educational institutes. The Maharashtra Education Society holds an important share.
In 1860 Maharashtra Education Society (MES), formerly known as the 'Poona Native Institutions', was founded by Vaman Prabhakar Bhave, Vasudev Balvant Phadke and Laxman Narhar Indapurkar. The great revolutionary freedom fighter Vasudev Balvant Phadke was the first Secretary and treasurer of Maharashtra Education Society. MES was formed with the aim of planting nationalistic thoughts and creating a generation of strong character and ideals. The last 152 years stand testimony to the fact that the aims of the society have been achieved. MES has given several gems in various fields, not just to Maharashtra but also to the nation.
What started as a simple, single seed is now an enormous tree - 'The Dnyan Vruksha'.
विशाल सोळंकी,
शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या स्थापनेला दि. १९ नोव्हेंबर २०१८ रोजी १५८ वर्ष पूर्ण होत आहेत. या संस्थेच्या वाघीरे विद्यालय, सासवड या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून म.ए.सो. च्या कौतुकास्पद कामगिरीचा मला सार्थ अभिमान आहे.
आज मला एका वेगळ्याच गोष्टीचा आनंद होत आहे तो म्हणजे मी स्वतःशीच केलेल्या दृढ निश्चयाचा व संकल्पपूर्तीचा!... ‘I.A.S. होऊन देशसेवा – समाजसेवा करण्याचा संकल्प’; ज्या ध्येयाने आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे व लक्ष्मण नरहर इंदापूरकर या त्रयींनी देशसेवेसाठी, समाजसेवेसाठी ही संस्था स्थापन केली, तसेच ध्येय ठेवून आपणही प्रशासकीय अधिकारी व्हायचे हा संकल्प पूर्णत्वाला गेला. तो स्वप्नपूर्तीचा आनंद काही वेगळाच होता.
१५८ वर्षांपूर्वी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी एक भव्य, उदात्त विचाराने शिक्षणाचे बीज महाराष्ट्रभूमीत पेरले. त्यांच्या समोर स्वप्न होते की, या संस्थेतून अशाप्रकारचे शिक्षण दिले जाईल की, ज्यायोगे विद्यार्थ्यांवर मानसिक, शारीरिक, बौद्धिक संस्कार होतील व नैतिकदृष्ट्या परिपूर्ण असलेली एक युवापिढी तयार होईल, जिचे राष्ट्रीय चारित्र्य भारतमातेच्या सेवेत सर्वस्वाचा त्याग करण्यास हसत-हसत तयार होईल.
विद्यादानासाठी झटणारी तरुणाई
शिक्षण हा विकासाचा राजमार्ग आहे हे आपण सगळेजण जाणतोच, पण समाजातील फार मोठा वर्ग असा आहे ज्याला परिस्थितीमुळे शिकता येत नाही. समाजातील अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर करण्यासाठी आपल्या ‘पॉकेटमनी’तून केलेल्या बचतीचा विनियोग विद्यादानासाठी करणारी तरुणाई आज सर्वांसाठी खरोखरच आदर्शवत आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगांवचा अजय भोसले, पुण्यातील संस्कार मोरे, लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचा युवराज जाधव, लातूर जिल्ह्यातील उदगीरचा सचिन खडके, पुण्यातील अनामिका किलसे, तृप्ती बाटुंगे आणि भाग्यश्री बोराटे हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये पहिल्या वर्षात शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी, कॉलेजमध्ये दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या ‘निनाद’ या भित्तीपत्रकाच्या निमित्ताने एकत्र आले आणि ‘आपणही समाजाचे काही देणे लागतो’ या सामाजिक जाणीवेने एकमेकांशी चांगलेच जोडले गेले.